Thursday, January 17, 2013

ढापलेल्या कविता फेसबुक वर

मित्रांनो / मैत्रिनिंनो / वाचकांनो / काव्य रसिकां नो आपल्या ढापलेल्या कविता या ब्लॉग ला आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल धन्यवाद .....
अश्याच कविता  फेसबुक वर पण वाचा 
त्यासाठी खली दिलेल्या लिंक वर क्लिक करा अणि पेज लाईक करा 


https://www.facebook.com/dpkavita


Monday, January 7, 2013

♥♥ मित्र ♥♥


♥♥ मित्र ♥♥
मित्राला दिलेले पैसे परत कधीच मागायचे नसतात...
कारण, मागितले तरी तो पैसे परत देत 
नाही........

मित्रानि पिताना दिलेला शब्द लक्षात कधी ठेवायचा नसतो... 
कारण, आठवणं करून दिली तरी तो विश्वास काही ठेवत 
नाही..... 

मित्राचा नको त्या वेळी आलेला फोन डीसकनेक्ट करायचा नसतो...
कारण, डीसकनेक्टकेला तरी तो घरी येणं टळत
नाही... 

मित्राला दिलेली गाडी पेट्रोल भरल्या शिवाय चालवायची नसते
कारण, टाकी रिकामी झाल्या शिवाय तो गाडी परत देतच
नाही....

मित्राला काही झाल तरी गर्ल फ्रेंड चा नंबर देता येत नाही 
कारण, काही झालं तरी तो तिला फोनकेल्या शिवाय रहात 
नाही.....

मित्राचा राग आला तरी त्याला सोडता येत नाही....
कारण दुख्खात असू आपण तेंव्हा तो एकट आपल्याला सोडत
नाही.... 

मित्र नको असला तरी त्याला सोडून पुढे जाता येत नाही 
कारण, जर हरवला तर तो आयुष्यात पुन्हा मिळत 
नाही....

|माझं आंधळ प्रेम….. ||


|माझं आंधळ प्रेम….. ||
माझी ही एक मैत्रीण होती,
खुप शांत अन अल्लड स्वभावाची,
कधीतरी यायची लहर तेव्हाच ती,
लाजून गालातल्या गालात हसायची..
मधाच्या पोकळीतून बोल ऐकू यावे,
असं ती सुमधूर आवाजात बोलायची,
बोलता बोलता मग का कुणास ठाऊक,
ती अचानक गप्प होऊन जायची..
बागेतली फुले तीला आवडायच्याआधी,
ती त्या फुलांना आवडायची,
फुलेही तीची सवड बघून तिच्यासोबत,
आनंदाने लाडावून बागडायची…
तिच्यासोबत चालता चालता,
वाटही कमी पडत असे,
तिच्या सहप्रवासात नेहमीच,
वाट पावलांनाच संपताना दिसे…
अशी काहीशी ती मला खुप आवडायची,
रोज रोज मला दिवसाच्या स्वप्नातही दिसायची,
तिला विचारण्याची हिम्मत माझ्यात नव्हती,
पण तरीही माझ्या मनास तिचीच आस असायची..
एकदा असचं तळ्याकाठी बसून,
तिचं प्रतिबिंब तळ्यात पाहत होतो,
विस्कटू नये म्हणून तरंगाना,
शांत रहा म्हणून सांगत होतो…
तेवढ्यात तिने मला विचारलं,
आज काय झालं आहे तूला?
मी उत्तरलो माहित नाही पण
मला काहितरी सांगायचे आहे तूला..
तुझी दृष्टी होऊन मला,
तुझं व्हायचं आहे,
तेवढ्यात ती उत्तरली,
मला दृष्टी नसेल तरी चालेल,
पण तुला एकदा माझ्या मिठीत,
माझ्या ह्या आंधळ्या डोळ्यानी पहायचं आहे..♥

खास मैत्रीण


कॉलेज मध्ये आपल्या खूप मैत्रिणी असतात,
पण जी आपल्याला पाहुन सुंदर smile देते ना,
ती आपली खास मैत्रीण असते.

जी आपल्याला रोज SMS करते,
आणि जिच्या SMS la आपल्याला पण छान Reply द्यावसा वाटतो ना,
ती आपली खास मैत्रीण असते.

जिच्याशी बोलताना आपल्याला खूप मजा येते,
पण तिच्या नजरेला नजर देऊन आपण कधी बोलू शकत नाही,
ती आपली खास अशी मैत्रीण असते.

तिची पण अवस्था काही निराळी नसते,
कारण, ती पण आपल्याशी बोलणे टाळत असते ना,
ती आपली खास अशी मैत्रीण असते.

ती कधी कॉलेजला नाही आली तर,
जीची आपल्याला विचारपूस करावीशी वाटते ना,
ती आपली खास मैत्रीण असते.

कधी मित्रमैत्रिणींशी बोलताना जी आपली
बाजू घेऊन बोलते ना,
ती आपली खास मैत्रीण असते,

जिच्या प्रेरणेमुळेच आपल्याला अशी कविता करावीशी वाटते,
आणि जी आपल्या अशा कवितांना नाही आवडल्या तरी,
छान होती... अशी एक दाद देते ना,
ती आपली खास अशी मैत्रीण असते.

सांग साद मला तू देशील ना..????


मि देईन कधी हाक तुला प्रिये
सांग साद मला तू देशील ना..
खूप अडखळीची आहे वाट ही
कधी कट्यांवरी पडेल टाच ही..
पडताना काळ्या अंधारात ह्या
सांग हात मला देशील ना..!!
तुझ्या प्रीतिची आहे ध्यास मला
तुझ्या भेटीची आहे आस मला..
एकटेपणाचा होइल भास् मला
सांग साथ मला तू देशील ना..!!
कधी रागवेन मि तुझ्यावरती
कधी असा भाड़ेंन तुझ्या संगती..
कधी येइल दडपण या मनावरती
सांग कुशीत मला तू घेशील ना..!!
मि देईन कधी हाक तुला प्रिये
सांग साद मला तू देशील ना..????

जे अशक्य वाटतय ते स्वप्न मला पहाचय..


जे अशक्य वाटतय
ते स्वप्न मला पहाचय..

ज्या शञुचा कोणी पराभव करु शकत नाही त्याला मला हरवाचय.. 
कोणालाही सहन होत नाही अस दुःख मला सहन कराचय..

ज्या ठिकाणी धाडसी माणस जाण्यास धाडस करत नाही त्या ठिकाणी मला जाऊन धावाचय.. 

ज्या वेळी माझे भाऊ थकलेत पाय थकलेत, हात थकलेत , शरीर थकलय
त्या वेळेस मला समोर मला " एव्हरेस्ट " दिसतय त्या वेळी मला माझे
एक एक पाऊल त्या " एव्हरेस्ट " च्या दिशेने टाकाचय.....

तो " स्टार " मला गाठाचाय मला " सत्यासाठी " झगडाचय सर्घष कराचाय.. कुठलाही प्रश्न त्यासाठी विचरायचा नाही थांबा घ्यायचानाही..
माझी नर्कात जायची सुद्धा तयारी आहे पण त्याला कारण " स्वर्गीय " असल पाहिजे.

ती मला आवडली न झोप उडून गेली ...


ती मला आवडली
न झोप उडून गेली ...

आयुष्याला नवी
दिशा मिळून गेली ...

प्रेमाचं रोपट
हृदयात लावून गेली ...

नव्या विश्वाची
ओळख होऊन गेली ..

कळली नाही प्रीत
मनी कशी फुलली ...

कधी माझ्या हृदयाची
राणी ती झाली ...

माझ्या मनाचं रान
ती बहरून गेली ...

माझा सारा वसंत
ती लुटून गेली ...

माझ्या भोळ्या मनाला
ती गुंतवून गेली ...

मला कायमचा
तिचा करून गेली..

ति तुच होतीस का गं?


ति तुच होतीस का गं?
अंगात हिरवा शालु नेसुन,
हातांत हिरवा चुडा,
केसांत माळलेला गजरा,
अन भांगातलं सौभाग्यलेणं
होय तिच तु...
माझ्या स्वप्नांत दिसणारी,
तु... माझं बेरंग आयुष्यात रंग भरणारी,
तु... आयुष्याला नवं ध्येय देणारी,
थोडीशी लाजरी बुजरी,
माझी "गोंडसपरी"
बोल होशील माझी माझी ?अर्धांगी??
लावशील कुंकु माझ्या नावाचं?
जगशील माझ्यासाठी,
अगदी माझीच बनुन?
बस...
अन मी तुझाच...
प्रत्येक जन्मासाठी....
सप्तपदीची सात पाऊले
वचने देखील सात
संकटे सारी जातील विरुन
जर हातात असेल तुझा हात

माझी आठवण कधीतरी येईल तुला


माझी आठवण कधीतरी येईल
तुला'
माझी आठवण कधीतरी येईल
तुला
जुन्या आठवणीत मग तू शोधशील
मला..... कुणालातरी माझी आठवण
सांगताना तू हसशील
पण त्या आठवणीत
मला पाहताच तू रडशील..... आठवेल तुला समुद्र
किनारी आपल्या दोघांच
फिरन
तुझ्या थरथरत्या स्पर्शात
मी स्वता हरवून जान..... तू माझा हातात हात घेउन अनेक
स्वप्न सजवन
माझ्या डोळ्यात पाणी येताच
मला हसवण..... आठवेल
तुला आपल्या प्रेमातला तो जुना पाउस
एकाच छत्रीत पाउसात
भिजणारी ती आपली हाउस..... ओल्या चिम्ब तुझ्या स्पर्शात
अंगावर येणारे शहारे
काळ्या गर्द वातावरणात
मोहरून गेलेले ते अंग सारे..... माझी आठवण येताच मी जवळ
असल्याच तुला भासेल
तुझ्या डोळ्यातून
निघालेला अश्रुचा प्रतेक थेंब
मी असेल.....
तू एकटी बसल्यावर आठवेल तुला प्रतेक क्षण
त्या क्षणांमधे दिसेल तुला माझ
तडफडणार मन..... माझी आठवण कधीतरी येईल
तुला
व्याकुळ होउन तुझ मन शोधेल
मला.

प्लीज हे जरूर वाचा...


प्लीज हे जरूर वाचा...

मी घर विकत घेऊ शकतो...
पण त्या घराचे घरपण नाही...

मी घड्याळ विकत घेऊ शकतो...
पण गेलेली वेळ नाही...

मी मोठे पद विकत घेऊ शकतो...
पण आदर नाही...

मी मखमली गादी विकत घेऊ शकतो...
पण शांत झोप नाही...

मी पुस्तक विकत घेऊ शकतो...
पण विद्या नाही...

मी औषधे विकत घेऊ शकतो...
पण चांगले आरोग्य नाही...

मी रक्त विकत घेऊ शकतो...
पण कोमेजून जात असलेले जीवन नाही...

पैसा हेच सर्वस्व नाही....

का रडतेस आता आणि कशासाठी ?


का रडतेस आता आणि कशासाठी ?
कोणीतरी सांगितले रडलीस फक्त
माझ्यासाठी..
तेव्हा तर हसत हसत मला दूर केले,
मग आता रडून दाखवून तू काय सिध्द
केले..
जेव्हा मला खरी गरज होती तेव्हा,
मला तर एकट्यालाचं सोडले..
मात्र
तुझ्या सोबतीला कोणीतरी होते,
म्हणून तू मागे वळून नाही पाहिले..
आता मला सवय लागली आहे
तुझ्याशिवाय जगण्याची,
मग तू का आस लावली आहेस माझी परत
येण्याची..
नको रडून मजबूर करूस मला परत
येण्यासाठी,
कारण ??
आता मी पुन्हा येणार नाही ते
दुःख सोसण्यासाठी.......

म्हणू तर काय म्हणू....


मला तिला PrOpose करायचय...
कसे करू समजतच नाही ..
मला तू खूप आवडतेस म्हणू ..कि
माझे तुज्यावर खूप प्रेम आहे म्हणू ...
.
...... मला तिला सांगायचय तू खूप
सुंदर दिसते कसे सांगू कळतच नाही ...
माझ्या स्वप्नातली परीम्हणू .. कि ..
स्वर्गातली अप्सरा म्हणू ..
.
मला तिच्यावर कविता लिहाचीय सुंदर ..
कसे लिहू उमजतच नाही ...
तू फक्त माझी म्हणू .. कि..
मी फक्त तुज म्हणू ...
.
मला तीचाशीच लग्न करायचय
कसे करू समजतच नाही .,
साथ जीवनभर देशील का म्हणू .,कि..
तुज्या नावापुडे माजे आडनाव लावशील का म्हणू ..
.
मला फक्त तीचासाठी जगायचं
कसे जगू मार्ग च सापडत नाही..
मी तुज्याशिवाय राहू शकत नाही म्हणू ..कि ...
तुज्याबरोबर जगणे फक्तप्रिय वाटते म्हणू ..
म्हणू तर काय म्हणू....

मला स्वप्नं पहायला खूप आवडत..


परवा एका मित्राने विचारल...

"सगळ्यात जास्त काय करायला आवडतं तुला?"

मी म्हटलं, "स्वप्न पहायला..

यावर सगळे हसू लागले..

वेडायस म्हणाले..
... मीही हसलो..
.
पण
खरच..

मला स्वप्नं पहायला
खूप आवडत..
.
कारण
.
ती एकच
जागा उरलीये
.
जिथे ती
अजुनही

भेटते
मला
.
.
.
न चुकता...@ 

का होतं मन असं हळवं


का होतं मन असं हळवं
कोणाच्या तरी आठवणीने ?
एक एक क्षण का वाटे युगासमान,
त्याच्या दूर जाण्याने ? 

भेटीनंतरही का .....
भेटण्याची आस असते ?
त्याच्याच गोड स्वप्नांमध्ये
का रात्र सारी हरवते ? 

त्याने फक्त आपल्यालाच पहावं,
आपल्याशीच बोलावं.. 
असं काही वाटू लागतं
प्रत्येक छोटी गोष्ट ही
त्यालाच सांगावी म्हणून मन आतुरतं 

कळलं का तुम्हाला, अचानक
असं वेड्यासारखं का होतं ?
दुसरं काही नाही .........
यालाच तर म्हणतात " प्रेमात पडणं "

♥ R o N n Y ♥

माझ्यासाठी तर माझ जीवनच आहेस तू


तुझ्या कड़े पाहताना,
मन माझ काही सांगत,
तुझ्या हस्या कड़े बघून,
स्वत: हसत राहत,

तुझ कोमल हास्य
मनात भरत
तुझ्या नजरे कड़े बघून
मन माझ हारत

तुझ सौन्दर्य
मन माझ फूलवते
तुला बघताच
चाँदनी ही लाजते

खुप सुंदर दिसतेस ग तू
माझ्यासाठी तर माझ जीवनच आहेस तू

♥ r O n N y ♥

पण ?? माझे डोळे पुसणार असं कुणीचं नाही..


सगळ्यांन साठी मी आहे,
पण ?? माझ्यासाठी कुणीचं
नाही..
सगळे मला सगळं
काही सांगतात,
पण ?? माझं ऐकणार असं
कुणीचं
नाही..
सगळ्यांच्या अडचणीत
धावणारा मी,
पण ?? माझ्या अडचणीत,
मला हात
देणारा असं कुणीचं नाही..
मित्र म्हणून असणारे असे
खूप
आहेत,
पण ??
मैत्री निभावणारा असं
कुणीच नाही..
ती गेल्यावर..
रोज रडतो मी आता,
पण ?? माझे डोळे पुसणार
असं
कुणीचं नाही..
माझ्यासाठी ती,अजूनही माझं
विश्व
आहे,
पण ?? तीच्यासाठी,
आता मी कुणीचं नाही..
आता मी खूप एकटा आहे,
अन् माझ्या शिवाय,
मला आता कुणीचं नाही..
अन् माझ्या शिवाय,
मला आता कुणीचं
नाही.....
♥ r O n N y ♥